राहुल बाबा म्हणत; अमित शाहांनी उडवली राहुल गांधीची खिल्ली

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा सध्या अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. इथं त्यांनी १००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवत जोरदार प्रहार केला. पुढे बोलताना शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं, काँग्रेस नेते विचारतात की ८ वर्षांत काय विकास झाला? हे लोक डोळे मिटून बसले नाहीत. राहुल बाबांनी आपला इटालियन चष्मा काढून पीएम मोदी आणि सीएम पेमा खांडू यांनी केलेली विकासकामं पाहावीत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२२) रोजी ते नामसाई जिल्ह्यात पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मेदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अरुणाचलच्या राज्याच्या पाठीशी नेहमीच उभं राहील, असं शाह म्हणाले. आसाम आणि मेघालय यांच्यातील सुमारे ६० टक्के आंतरराज्य सीमा विवाद सामंजस्यानं सोडवण्यात आले आहेत. मला खात्री आहे की, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील वाद २०२३ पूर्वी संपुर्ण मिटलेला असेल, दोन्ही सरकार या दिशेने काम करत आहेत असं शाह म्हणाले.

Prakash Harale: