(Rahul Dravid On KL Rahul) सध्या ऑस्ट्रोलियात टी 20 विश्वचषक सामने खेळले जात आहेत. भारताने आत्तापर्यंत सुपर 12 मधील 3 सामने खेळले असून या तीनही सामन्यात आघाडीचा फलंदाज केल राहुलच्या कामगिरीवर सध्या सवाल उपस्थित केले जात असताना प्रशिक्षक राहुल द्रविडने मोठं वक्तव्य केलं आहे.
बांगलादेशविरूद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल द्रविड यांनी केएल राहुलच्या संघातील भविष्याबाबत एक मोठे वक्तव्य केले. द्रविड स्पष्ट म्हणाले, ‘मला आणि रोहितला आमची सलामी जोडी कोण असेल हे स्पष्टपणे माहिती आहे. मला माहिती आहे की केएल राहूलच्या फलंदाजीत काय क्षमता आहे. तो सामन्यावर किती प्रभाव पाडू शकतो हे मला माहिती आहे. तो धडाक्यात पुनरागमन करेल असा मला विश्वास आहे.’
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केएल राहुलने पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरला आहे. यामुळे नेटकरी आणि क्रिकेट जाणकार देखील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. केएल राहुलला संघातून डच्चू मिळेल असेही बोलले जात होते. मात्र या सर्व शक्यतांवर राहुल द्रविड यांनी उत्तर दिले.