खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून ट्विटरच्या बायोमध्ये मोठे बदल

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त टीका करणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चांगलेच महागात पडले. राहुल गांधी यांची खासदारकीच रद्द करण्याचा निर्णय संसदीय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळेच काँग्रेसने आज देशभर आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात तर राजघाटावर आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरील बायोमध्ये बदल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवरील बायोमध्ये खासदार ऐवजी डिस्क्वॉलिफाईड एमपी म्हणजेच निलंबित खासदार असा त्यांनी उल्लेख केला आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आणि दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये निलंबित खासदार असं लिहून एक प्रकारे भाजपचा निषेध नोंदवला असून देशात हुकूमशाही कशा प्रकारे सुरू आहे, हे दाखवण्याचाच त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

Dnyaneshwar: