“भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष, भीती…”, राहुल गांधींचा शेगावमधून हल्लाबोल!

बुलढाणा : (Rahul Gandhi On Narendra Modi) शुक्रवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाण्यातील शेगावच्या सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला जात आहे. तुम्ही जिथं पाहाल तिथं तुम्हाला द्वेष, भीती आणि हिंसा दिसेल. याविरोधासाठीच भारत जोडो यात्रेची गरज आहे. या यात्रेचा उद्देश मन की बात करण्याचा नाही, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा, त्यांचं दुःख समजून घेण्याचा आहे,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत,

“द्वेषाने या देशाचा कधीच फायदा झाला नाही, अन् होणार नाही. विरोधक विचारतील भीती कशाची? जर ते या रस्त्यांवर फिरले असते तर पाच मिनिटात त्यांना ही गोष्ट समजली असती. या राज्यात मागील सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. का केली? कोणत्याही शेतकऱ्याशी बोला, ते म्हणतील आम्हाला योग्य दर मिळत नाही. मी हे ऐकून कंटाळलो आहे,” असं राहुल गांधींनी सांगितलं.

“मी दुसरा प्रश्न विचारतो, तर ते म्हणतात विम्याचे पैसे भरले, मात्र नुकसान झाल्यानंतर एक रुपयाही मिळाला नाही. यानंतर ते शेतकरी प्रश्न विचारतात की, शेतकरी आत्महत्या करतो कारण ५० हजार एक लाखाचं कर्ज असतं. त्यानंतर हजारो शेतकरी आत्महत्या करतात,” मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ होतं, मात्र शेतकऱ्यांचे होत नाही असंही त्यांनी नमूद केलं.

Prakash Harale: