नवी दिल्ली : (Rahul Gandhi On Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी यांनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात काँग्रेस आणि राहुल गांधी यांना धारेवर धरत जोरदार निशाना साधला. त्यानंतर आज राहुल गांनी यांनी यांनी पत्रकार घेत मणिपूरच्या हिंसाचारावरून पंतप्रधानांवर टीकास्त्र डागलं आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मणिपूरच्या घटनेवर हसून बोलत होते, जोक्स करत होते, आमची थट्टा करुन बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. या देशात हिंसा होत असेल त्रास होत असेल तर दोन तास या देशाच्या पंतप्रधानानं थट्टा करायला नको. त्यावेळी विषय काँग्रेस नव्हता, मी नव्हतो तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय? ते थांबवलं का जाऊ शकत नाही हा विषय आहे. मी यापूर्वी बोललो नाही पण आता बोलतो आहे. मी १९ वर्षे राजकारणात आहे, मी आपत्ती दरम्यान प्रत्येक राज्यात गेलो आहे. पण आजवर मणिपूरमध्ये जे झालं ते मी याआधी कधीही पाहिलेलं नाही”.
मी सभागृहात म्हटलं की, “पंतप्रधानांनी अमित शहांनी भारत मातेची हत्या केली. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आलं आहे. हे विधान मी उथळपणे केलं नव्हतं. याचं कारण मी सांगतो, जेव्हा आम्ही मणिपूरमध्ये पोहोचलो तेव्हा मैतेई भागात गेलो आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की, जर तुमच्या सिक्युरिटीमध्ये कोणीही कुकी असला तर आम्ही त्याला मारुन टाकू.
तसेच कुकी भागात गेलो तिथं आम्हाला सांगितलं की तुमच्यात कोणी मैतेई असेल तर त्याला गोळी मारुन टाकू. यावरुन मणिपूर हे एक राज्य राहिलेलं नाही त्याचे दोन भाग झाले आहेत. राज्याची हत्या झाली असून त्याची चिरफाड केली आहे. म्हणून मी म्हटलं की, भारताची हत्या मणिपूरमध्ये झाली.
पण मी काल पंतप्रधानांना बघितलं की, ते हसत मस्करी करत बोलत आहेत. मला हे कळत नव्हतं की भारताचा पंतप्रधान एका पत्रकाराशी असं कसं बोलू शकतो. आपल्या पंतप्रधानां हे कळतचं नाहीए की देशात काय सुरु आहे” अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या भाषणावर सडकून टीका केली.