“काँग्रेसनं 70 वर्षात जे कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं”

नवी दिल्ली | Rahul Gandhi On PM Narendra Modi – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “भारतातील लोकशाहीची रोज हत्या होत असून देशातील लोकशाही पूर्णपणे संपली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे सर्वसामान्यांचे प्रश्न आम्हाला मांडायचे आहेत. काँग्रेसने 70 वर्षात जे कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावल्याचा” आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

काँग्रेसकडून महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवास्थानाला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. “विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक 24 तास खोटं बोलण्याचं काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत” असल्याची टीका राहूल गांधींनी केली आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. संसदेचे कामकाज सुरू असताना अशा परिस्थितीत खर्गे यांना बोलावणे हा लोकशाहीतील विधिमंडळाचा अपमान असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करत मोदीशाहीची पातळी सातत्याने घसरत असल्याची टीका केली आहे.

Sumitra nalawade: