हरियाणातील निकाल अनपेक्षित’! राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

हरियाणा विधानसभा निवडणूक निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

हरियाणा (Haryana Election Results), जम्मू आणि काश्मीरमधील निवडणूक (Jammu Kashmir Election Results 2024) निकालावर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ”जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. हा लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.” असे राहुल गांधी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

”हरियाणातील अनपेक्षित निकालाचे आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला देऊ. हरियाणातील सर्व लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.” असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

आम्ही अधिकार, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठीचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज बुलंद करत राहू, असेही राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे.

Rashtra Sanchar: