उल्लेखनिय कामगीरी करणार्यांचा गौरव
दहा वर्षांपूर्वी एडिसन पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. ही एक वार्षिक स्पर्धा असून त्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नवीन उत्पादन व सेवा विकास, विपणन, मानवकेंद्रित रचना व नवनिर्मिती आदींची दाखल घेवून त्यांचा गौरव करण्यात येतो. या सर्व व्यक्ती, संस्था थॉमस अल्वा एडिसन यांच्या कार्याचा वारसा चालवित आहेत. यंदाचा पुरस्कार सोहळा नुकताच फोर्ट मायर्स, फ्लोरिडा येथे संपन्न झाला.
पुणे : पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी त्वरित उपलब्ध करणार्या अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या या तंत्राची दाखल अमेरिकेने घेतली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या एडिसन पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पहिले स्थान मिळवत अॅक्वा प्लस च्या राहुल पाठक याना सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. या तंत्राचा उपयोग नैसर्गिक आपत्तीतील गरजूंना होत असून आतापर्यंत युनिसेफ, ऑक्सफॅम जीबी, रेड क्रॉस, रेड आर इंडिया, आयएफआरसी आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्थांमार्फत ही सुविधा गरजुंपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यात आली आहे.
अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या वॉटर फिल्टर्सचा २००५ साली झालेल्या जम्मू-काश्मीर भूकंपाच्या बचावकार्यात ५ हजार हून अधिक नागीराकांपर्यंत पिण्याचे पाणी पुरवण्यात यशस्वी वापर करण्यात आला होता. उत्तराखंड, जम्मू, केरळ, आसाम आणि चेन्नई महापुरावेळी सुमारे १५०० ठिकाणी अॅक्वा प्लसची पाणी शुद्धीकरण प्रणाली कार्यन्वित करण्यात आली होती. तसेच यातील एका ठिकाणी बसवण्यात आलेल्या अॅक्वा प्लसच्या एका मॉडेलने १० तासांत ७,००० लिटर पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी डोंगराळ भागातील नागरिकांना आपत्कालीन परीस्थित उपलब्ध करून दिले होते.
आजवर सुमारे ५० हून अधिक वेळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन परिस्थितींमध्ये अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या पाणी शुद्धीकरण प्रणालीचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरली जाणारी उपकरणे विजेशिवायही चालू शकतात.