काही झाले तरी अमितला निवडून आणणार : राज ठाकरे

अमित ठाकरेला निवडून आणण्याचा राज ठाकरेंचा निर्धार

ज्यांना लढायचे आहे त्यांनी लढावे. आम्ही ही लढण्यासाठी तयार आहोत. शेवटी काही झाले तरी अमितला नक्की निवडून आणणार, असा निर्धार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी प्रभादेवी येथील प्रचारसभेत व्यक्त केला.

मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ प्रभादेवी येथे मनसे – अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब असताना ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या तिकिटावर उभे राहिले. तिथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत गेले. तिथून आमदार झाले. एकनाथ शिंदेंनी बंड केले. त्यावेळी सकाळी सरवणकरांनी शिंदेंना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी शिंदेंकडेच गेले. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते तुमचे काय होणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिव- सेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले,लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहणार…माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. पण जे समोर येतील त्यांच्याशी लढू, पण अमित ठाकरेंना नक्की निवडून आणणार, असं राज ठाकरे यांनी सांगितले. नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित ठाकरे बोलला की सर्व नेत्यांनी उभं राहीलं पाहिजे, मी पण उभा राहील. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं तु निवडणुकीसाठी उभा राहणार आहेस? अमित बोलला तुम्ही सांगाल तर राहील. आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. 

Rashtra Sanchar: