हीच ती वेळ! ठाकरे बंधू एकत्र येणार?; ‘मनसे’ नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : (Raj Thackeray And Uddhav Thackeray) राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु आहेत. त्यातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चेला उधाण आलं आहे.

माध्यमांशी महाजन म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. राज्यातील जनतेला हे सर्व काही आवडलेलं नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. मात्र, हे फक्त उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांना नेतृत्व देऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत.”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामानिमित्त या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेत काही राजकीय चर्चा देखील होणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: