पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भातील आक्रमक भूमिकेवर हिंदू महासंघाने राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक असल्याची टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे हिंदूंवरच बंधनं येतील असं महासंघानं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हिंदू जननायक नसून सेक्युलर जननायक असल्याचं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
यावेळी आनंद दवे म्हणाले की, मंदिरातील काकड आरती, गणेशोत्सव, शिवजयंती, गावच्या यात्रा, दहीहंडी असे सारेच उत्सव यामुळे धोक्यात येतील. भोंगे उतरवण्याच्या या भूमिकेमुळे हिंदूंचे नुकसान होईल असंही ते म्हणाले. यावेळी मशिदींवरील भोंगे आधी मग मंदिरावरील भोंगे उतरवू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्यानं सर्वाधिक कोंडी हिंदूच्या मंदिरांचीही झाल्याचं मत दवेंनी व्यक्त केलं आहे.