“राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे, तर दुसरीही लवकरच…”, राज ठाकरेंचा मोठा दावा

पुणे | Raj Thackeray – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी सरकारसोबत युती केल्यावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे तर दुसरीही लवकरच जाईल, असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी केला आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “राष्ट्रवादीची एक टीम तर सत्तेत गेली आहे आता दुसरी टीमही लवकरच जाईल. जे अजित पवारांना जेलमधून टाकू असं म्हणाले होते त्यांनीच आता पवारांसोबत युती केली आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

पुढे राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “सध्या अमित महाराष्ट्रभर दौरे करत आहे. पण तो टोल फोडत चालला असं नाहीये. गाडीला फास्ट टॅग असूनही अडवलं, अमित यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसंच रस्त्याची अवस्था बिकट झाली असतानाही टोल वसुली कशासाठी”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

admin: