निवडणूक शिवसेना-भाजपची अन् चर्चा राज ठाकरेंची!

मुंबई : (Raj Thackeray On Devendra Fadvavis) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांनी उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना मैदानात उतरले आहे. या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापायला सुरुवात आली.

दरम्यान, अंधेरी पुर्व पोटनिवडणूक जरी शिवसेना-भाजप यांच्या रंगली असली तरी, निवडणूक न लढवता पणे मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जिंकली आहेत. इकडे दोन्ही गटाकडून प्रचाराचे नारळ फुटले आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एका बाजूला ऋतूजा लटके या नवख्या असल्या तरी रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतिची लाट आहे, तरी दिसऱ्या बाजूला सत्ता आणि राजकारणातील कसलेला उमेदवार रिंगणात आहे.

या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक परिपत्रक काढून म्हणाले, मी एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर त्या मतदार संघात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतो. तसे करणे म्हणजे त्या दिवंगत लोकप्रतिनीधीला श्रद्धांजलीच अर्पण करणे अस मी मानतो. त्यामुळे आपणही तसच करावं, अस आवाहन राज ठाकरे यांनी या पत्रातून भाजपला केलं आहे. यावर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणाक आहे.

Prakash Harale: