जरांगेंना तोंडावर सांगितलं, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे असे का म्हणाले..

मुंबई : (Raj Thackeray On Manoj Jarange) जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल.

जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मला या गोष्टी काही स्पष्ट वाटत नाहीत. कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Prakash Harale: