वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते, राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस-पवारांवर मिश्किल टीप्पणी

Raj Thackeray 14Raj Thackeray 14

मुंबई : (Raj Thackeray On Shinde-Fadnavis-Pawar) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) वडापाव (Vadapav) महोत्सवाच्या कार्यक्रमात म्हणाले की, मागील एक वर्षापासून वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते. यावेळी त्यांनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही, अशी मिश्किल टीप्पणी सरकारवर केली आहे.

गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी या मंचावरुन वडापावचं भरभरुन कौतुक देखील केलं. वडापावचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या दिवंगत अशोक वैद्य यांचं संपूर्ण कुटुंब देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

यावेळी अशोक वैद्य यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळी राज ठाकरेंनी केली. तसेच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची देखील वडापाव बद्दलची आठवण यावेळी राज ठाकरेंनी सांगितली. आज हा वडापाव अनेक ठिकाणी पोहचलाय. पण मी आजपर्यंत वाईट वडापाव कुठेही खाल्ला नाही. खरंतर हे अशोकरावांचे आभार की त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या आणि गाड्या उभ्या करण्याची संधी दिली, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

Prakash Harale:
whatsapp
line