निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना पुणेकरांचा पुळका; करवसुली कमी करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, निर्णयाकडे लक्ष!

मुंबई : (Raj Thackeray Send Letter In Eknath Shinde) पुणे महापालिकेनं अचानक शहरातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटीसा धाडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ही कर वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी करणार पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे.

पुणे महापालिकेनं अचानक शहरातील नागरिकांना पूर्वलक्ष्यी प्रभावानं मिळकत कर वसुलीच्या नोटीसा धाडल्या आहेत. सन १९७० च्या ठरावानुसार, करपात्र मुल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणं मिळकतकरात काही सूट दिली जात होती. सन २०१९ ला ही सूट विखंडीत करण्यात आली.

पण मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखापरिक्षणात एकही आक्षेप आला नसताना ही सूट विखंडीत का केली? तुर्तात या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असली तरी यावर कायमस्वरुपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Prakash Harale: