राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर; शहर मनसेतील नाराजी नाट्य थांबवणार का?

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज यांच्या भोंगा भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून नाराजी नाट्य दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यात शहर मनसेतील नाराजी नाट्य थांबवणार का?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Prakash Harale: