“दारूगोळा साठवून ठेवलेला बरा, कारण…”; राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा

मुंबई | Raj Thackeray – सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. असं असतानाच दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून बसले आहेत. अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तरीही सर्व पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार पक्षबांधणी केली जात आहे. तसंच राज ठाकरेंनी गुरुवारी (15 डिसेंबर) संध्याकाळी विक्रोळीतील एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांना सूचक इशारा दिला. ते विक्रोळीतील मनसे शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

“विक्रोळीच्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो.. मी सगळ्या ठिकाणी भाषण करत नाही. कारण निवडणुका कधीही लागतील. त्यामुळे दारुगोळा साठवून ठेवलेला बरा. प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. पण तुम्ही सगळे इथे आलात. फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी मी व्यासपीठावर आलोय”, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा मी प्रत्यक्ष आपल्यासमोर येईन आणि ज्याची जी फाडायची, ती फाडेनच. पण सध्या तुम्ही या महोत्सवाचा आस्वाद घ्या”, असा जाहीर इशारा राज ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)