राज ठाकरे यांच्या सुरक्षेत होणार वाढ; या दर्जेची मिळणार सुरक्षा

मुंबई : काल पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण आयोध्या दौरा करणार असल्याचे जाहिर केले आहे. या पार्श्चभुमीवर आता केंद्र सरकार राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवणार असल्याची आधिकृत माहिती समोर येत आहे. त्यांचा आयोध्या दौरा लांब जरी आसला तरी, त्यांनी मजिदीमधील भोंग्यावरुन मुस्लीम समाजाचा रोष आंगावर ओढावून घेतला आहे. त्यांच्या हा निर्णयामुळे राज्यासह संपुर्ण देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज हे ५ मे रोजी आयोध्याला जाणार आहेत. यामुळे केंद्र सरकार त्यांना विशेष सुरक्षा देणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. सध्या राज ठाकरे यांना Y प्लस सुरक्षा देण्यात येत आहे. याबरोबरच योगी सरकार देखील राज ठाकरे यांना त्यांच्या आयोध्या दौऱ्यादरम्यान अधिक सुरक्षा देणार आसल्याची माहिती समोर येत

दरम्यान, राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंती निमीत्ताने पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदीरात महाआरती आणि सामुहिक हनुमान चालिसाचे पठन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. मी कोणत्याही धर्माविरोधात बोलत नाही. मला राज्यातील शांतता बिघडावयाची नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, सांगून देखील कोणी ऐकणार नसेल तर आम्हाला आमचा आमचे मार्ग मोकळे आहेत. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. यामुळे हिंदु-मुस्लीम असा वाद निर्माण झाला आहे.

Prakash Harale: