राज ठाकरेंनी बंभीर मुद्दा आणला समोर, सरकारकडे केली मागणी; म्हणाले “पुन्हा अशा बातम्या…”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerey) कायम वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन समोर येतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी मशिदींवरील लाउडस्पीकर वरून सरकारला ते हटवण्याची मागणी केली होती. त्यांनतर त्यांनी महाराष्ट्रातील चित्रपट गृहांत मराठी सिनेमे चालवावेत, रेडीओवर देखील मराठी कार्यक्रम चालवावेत अशीही विनंती केली होती. मात्र, आता त्यांनी खूपच महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. लहान मुलांच्या वेठबिगारी वरून त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात लहान मुलांच्या वेठ्बिगारीच्या बातम्या येत आहेत. यासंबंधित राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावार एक पोस्ट लिहिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.’ अशा आशयाची पोस्ट लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडं नागरिकांचं आणि प्रशासनाचं लक्ष जावं यासाठी त्यांनी सोशल मिडीयावर पाठवली आहे.

पोस्ट मध्ये त्यांनी एक पत्रक देखील जाहीर केलं आहे. त्यात प्रशासनाने या गंभीर मुद्द्यावर लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर मनसे सैनिकांनाही त्यांनी वेठबिगारी करणारा कोणी सापडला तर आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याचे आदेश दिले आहेत.

Dnyaneshwar: