पुणे : दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर असलेलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना झाले असून त्यांची पुण्यात होणारी सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे. मनसेने सभा रद्द झाली असल्याच पत्र डेक्कन पोलिसांना दिल आहे. येत्या २१ तारखेला नदीपात्रात ही सभा होणार होती. मात्र पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे.
अवघ्या काही दिवसांनी राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याआधी राज ठाकरेंची सभा होणार का, याकडे लक्ष असणार आहे.