खासदार राजन विचारे यांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले, “आनंग दिघे यांना टाडा लागला पण ते…”

ठाणे | Rajan Vichare On Shinde Group – खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आनंद दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी झटत होते. त्यांना टाडा लागल्यानंतरही त्यांनी अडीच वर्ष तुरुंगात काढली. परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाही. त्यामुळे दिघे साहेब यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा टोला राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

आज (26 ऑगस्ट) शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राजन विचारे हे टेंभीनाका येथे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवत आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या घरामध्ये आनंद दिघे यांची पूजा केली जाते. आनंद दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी झटत होते. त्यांना टाडा लागल्यानंतरही त्यांनी अडीच वर्ष तुरुंगात काढली. परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाही. गद्दारांना क्षमा नाही, या विधानातून त्यांनी माघार घेतली नाही.

त्यामुळे दिघे साहेब हे दिघे साहेब आहेत. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा टोला राजन विचारे यांनी शिंगे गटाला लगावला. तसंच आम्ही खरे शिवसैनिक आहोत. राज्यात जे काही सुरू आहे. ते उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे. त्यामुळे त्याचा हिशोब जनताच करेल, असंही ते म्हणाले.

Sumitra nalawade: