सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजर्षी शाहूमहाराज

पुणे : राजर्षी शाहूमहाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील, राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहूमहाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहूमहाराज, राजर्षी शाहूमहाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहूमहाराज झाले.

शाहूमहाराज दलित आणि बहुजनांचे कैवारी
२६ जून १८७४ रोजी जन्मलेल्या शाहूमहाराज दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली. दलित आणि बहुजनांचे कैवारी म्हणून आजही त्यांना मानाचे स्थान आहे. ब्रिटिश राजसत्तेमध्ये गोरगरीब जनतेला न्याय आणि हक्काची वागणूक मिळावी, यासाठी ते नेहमी झटत होते.

शाहूमहाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. २६ जून हा शाहूमहाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासून सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. शाहूमहाराजांनी सरकारी नोकर्‍यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळीप्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला.

आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला, तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले. १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ शब्दांत गौरविलेले आहे.

Dnyaneshwar: