The Kerala Story चित्रपटाबद्दल स्टेटस ठेवण विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याला पडलं महागात

जयपूर | ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चर्चेसोबतच वादातही आहे. सिनेमा आज प्रदर्शित झाला असून सिनेमा केरळमधील महिलांचे सक्तीचे धर्मांतर आणि धार्मिक कट्टरतेवर आधारित आहे. हेच सिनेमाच्या वादाचे मुख्य कारण आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की केरळमध्ये सुमारे 32 हजार महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि त्यातील अनेकांना ISIS शासित सीरियात नेण्यात आले. या दाव्याला एक पक्ष आव्हान देत आहे. याला राजकारणाने प्रेरित आणि प्रोपोगंडावाला सिनेमा म्हणूनही अनेकजण संबोधित करत आहेत. अशातच या चित्रपटाबद्दल चांगलं मत व्यक्त करणं एका माणसाला चांगलच महाग पडलय.

राजस्थानमधील जयपूर येथील एका व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘द केरळ स्टोरी’ बद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. या माणसाने त्याच्या व्हॉट्स अप स्टोरीमध्ये तरुण महिलांना ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्याची विनंती केली होती. म्हणून या माणसाला बेदम मारहाण करण्य़ात आली. त्याला धमकावण्यात आलं.

“पीडीत व्यक्ती शनिवारी रात्री आपल्या घरी येत होता. त्यावेळी तिघांनी त्याला वाटेत अडवलं. व्हॉट्सअप स्टेटसवर चित्रपटाच कौतुक करुन, तू आमच्या समाजाचा अपमान केला, असं ते तिघे बोलल्याच पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं” सहाय्यक पोलीस आयुक्त देरावर सिंह यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

Dnyaneshwar: