“सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ…” मनसे आमदार राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : (Raju Patil On Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेशी बंड पुकारलं. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या अन् राज्यात शिंदे आणि फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. या सरकार स्थापनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव राजू पाटील यांनी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं आहे.

दरम्यान, हे सर्व चालू असताना आता आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा नाही की, आम्ही जे चाललंय ते सर्व खपवून घेऊ हे आजीबात शक्य नाही. यांच्या वाईट गोष्टींना आमचे समर्थन अजिबात नाही. यावर कुणीतरी बोलायला पाहिजे.

आमची भावना कुणावरही टीका करण्याची नाही, तर अशा कामांकडे लक्ष वेधण्याची आहे. जिथे कामं झाली नसतील, तिथे आम्ही बोलणार आहोत. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा होत नाही की, राज्यात जे काही चाललंय ते सर्व खपवून घेऊ, जिथे-जिथे अन्याय दिसेल, तिथे आम्ही बोलणार असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे

Prakash Harale: