“सरकारमध्ये मंत्रीपदाच्या अपेक्षेनं नाही तर…” आमदार राजू पाटील

डोंबिवली – (Raju Patil On Press Conference) राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांच्या एका मताला महत्त्व आलं होतं. मनसेच्या या सहकार्यामुळे त्यांना शिंदे-फडणवीस नव्या सरकारमध्ये भाजप कोट्यातून मंत्रीपद दिलं जाणार असून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना ही संधी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे..

दरम्यान, यावर बोलताना मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत भाजपाला पाठिंबा दिला, राष्ट्रपती निवडणूकीत देखील त्यांना पाठिंबा देत आहोत. हा मंत्रीपदासाठी नाही तर, पाठिंबा हिंदुत्वासाठी दिला आहे. कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही त्यांनी सांगितलं.

मनसेच्या एका नेत्याला भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदारकी मिळणार आहे. यावर पाटील म्हणाले, जर विधानरिषदेवर आमच्या पक्षातील नेते आमदार म्हणून जात असतील तर आनंदच आहे, दोन्ही सभागृहात आमचा आवाज असेल आणि अशी गोष्ट घडली तर स्वागत आहे. आम्ही हिंदुत्वासाठी सरकार मध्ये आहोत. पेट्रोल , डिझेल भाव या सरकारने कमी केले, या निर्णयाचं मनसेकडून स्वागत करण्यात आले असून मनसे आमदार पाटील यांनी सांगितलं.

Prakash Harale: