पवारांची खेळी, काॅंग्रेसचा नवा गेम; शिवसेनेची गोची

मुंबई : (Rajya Sabha Election On Sharad pawar new plan) सध्या मविआ आणि भाजप यांच्यात राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने चांगलीच रस्सीखेच पहायला मिळत आहे. आज मतदान होऊन सायंकाळपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल, पण त्याआधिच शरद पवार आणि काॅंग्रेसने शिवसेनेची गोची केल्याची माहिती समोर आली आहे. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत.

दरम्यान, मतांचा तुटवडा पडू नये, आणि कोणताही धोका होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदानाचा कोटा वाढवला. आता काँग्रेसनंही हीच खेळी करत त्यांचे सर्व आमदार म्हणजेच एकूण ४४ जण इम्रान प्रतापगढी यांच्या मदतीला उतरवले आहेत. ४२ मतांचा कोटा असताना काँग्रेसनं देखील दोन मतं अधिकची ठेवली आहेत. त्यामुळं शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहेत. आता सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढल्याचं म्हटलं जातं आहे.

मात्र, कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळं नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे शरद पवार यांनी रात्रीतून कोटा वाढवल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काँग्रेसनंही त्यांच्या सर्व आमदारांना पाठिशी उभं केलं आहे. सर्वांत पहिले राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान केलं. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मतदान केलं आहे.

Prakash Harale: