चाहता सेल्फी काढण्यासाठी जवळ येताच राखी संतापली; म्हणाली, “माझं लग्न…”

मुंबई | Rakhi Sawant – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत आहे. राखी सावंतनं आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केल्याची घोषणा केली होती. तसंच तिनं तिच्या लग्नाचे काही फोटो देखील शेअर केले होते. त्यावेळी आदिलने राखीसोबतच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ केली होती. पण, आता आदिलने लग्नाची कबुली दिली आहे.

आदिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदिल आणि राखीनं लग्न केल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत आदिलने त्यांच्या लग्नाची कबुली दिली आहे. तसंच या पोस्टखाली राखीनं कमेंट करत आदिलचे आभार मानले आहेत.

बऱ्याचदा राखीला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. नेटकऱ्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला राखी कंटाळली आहे. हे तिच्या बऱ्याच व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसंच नुकतंच राखी तिच्या एका चाहत्यावर चांगलीच संतापली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका कॉफी शॉपच्या बाहेर राखी उभी राहिलेली असते. तेव्हा तिला पाहून तिचा एक चाहता तिच्यापाशी येतो आणि सेल्फी घेण्यासाठी विनंती केरतो. नंतर तो चाहता राखीच्या अगदी जवळ येऊन फोटो काढू लागल्यावर राखी त्याच्यावर संतापते. यावेळी राखी म्हणाली की, “थोडं लांब राहून फोटो काढा, माझं लग्न झालं आहे. पहिली गोष्ट वेगळी होती आता तुम्ही मला अशा पद्धतीनं स्पर्श करू शकत नाही.” राखीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी पुन्हा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Sumitra nalawade: