सलमान भाईजानसाठी राखीने हात जोडून मागितली बिश्नोई समाजाची माफी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) हे नाव सतत चर्चेत आहे. बिग बॉस मध्ये राडा घालून बाहेर आल्यावर राखीने आदिल दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. त्यानंतर त्यांच्या नात्यात वाद सुरू झाले आणि हे वाद कोर्टापर्यंत गेले. आता राखीने रमजान महिन्यात रोजाचा उपवास ठेवला आहे. त्यानिमित्त तिने आपल्या मित्रांसाठी खास इफ्तार पार्टी ठेवली होती. त्यावेळी तिने पापराझींसोबत सुद्धा संवाद साधला. तेव्हा तिने सलमान खानला (Salman Khan) मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांवरून आपली प्रतिक्रिया दिली.

मीडिया सोबत बोलताना राखी म्हणाली, ‘माझ्या मते सलमान खान एक खूप चांगली व्यक्ती आहे. तो गरिबांचा कैवारी आहे. तो इतरांसाठी इतके काही करतो, त्यामुळे सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा. माझी इच्छा आहे की सलमान खानच्या दुश्मनांचे डोळे फुटावे, त्यांची स्मरणशक्ती जावी, मी अल्लाहकडे दुआ मागते की मी माझ्या सलमान भाईचा वाईट विचार करू नये.’ एवढेच नाही तर राखी सावंतने बिश्नोई समाजाची देखील माफी मागितली. कान पकडून उठाबशा काढल्या. गरिबांचा दाता असणाऱ्या सलमान खानला टारगेट करू नका असे म्हणत हात जोडून तिने सलमान खानच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागितली.

Dnyaneshwar: