राखी सावंत प्रियकरासोबत पोहचली पोलीस ठाण्यात; केली ‘ही’ धक्कादायक माहिती उघड

मुंबई | मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. तसंच ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. यापूर्वी तिनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. तसंच आता मात्र राखी चक्क रडताना समोर आली आहे. नुकतंच राखीनं आपल्या प्रियकरासोबत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

राखी सावंतचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिचा पूर्वाश्रमीचा नवरा रितेशवर संशय घेत असल्याचं दिसत आहे. शनिवारी रात्री राखी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. त्यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर मीडियाने तिची वाट अडवली. यादरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडताना दिसत आहे. तर तिचा प्रियकर तिला धीर देताना दिसत आहे.

राखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. यामागे तिचा पूर्वाश्रमीचा नवरा रितेश असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. म्हणूनच ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. यावेळी ती म्हणाली, मला माहित आहे की मी तीन वर्षे कशी काढली. लॅाकडाऊनमध्ये मी एकटी पडले होते. म्हणूनच मी त्याला सोडलं. देवाने असा पती कोणाला देऊ नये. आता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करत आहे. मला गलिच्छ मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्याने मला फसवलं आहे. तो माझा फोनही उचलत नाही. त्याने मला छळलं आहे. धक्के मारून घरातून बाहेर काढलं आहे. पण मी कधीही तक्रार केली नाही. पण आता त्याने माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर अटॅक केला आहे, तो माझ्या अश्लील व्हिडिओही पोस्ट करु शकतो.

Nilam: