राखी सावंत गरोदर? अभिनेत्रीनं स्वत:च केला खुलासा; म्हणाली, “मी सिंगल मदर…”

मुंबई | Rakhi Sawant – सध्या ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) ही चांगलीच चर्चेत आहे. राखीनं तिचा बाॅयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत (Adil Durrani) लग्न केलं आहे. तसंच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राखीनं स्वत: तिच्या लग्नाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोबतच तिनं लग्नाबाबत मोठा खुलासाही केला आहे. त्या दोघांचं लग्न 29 मे 2022 ला झालं असून त्यांनी 2 जुलै 2022 ला लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र, यावर आदिलनं मौन बाळगलं आहे. अशातच आता राखी सावंत गरोदर असल्याचं बोललं जात आहे.

राखी आणि आदिल यांनी सात महिन्यांपूर्वीच निकाह केला आहे. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखीनं फॅमिली प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं आहे. तिनं नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

यावेळी राखी म्हणाली की, “आदिलबरोबर लग्न केल्याचा मला खूप आनंद आहे. पण तो का ही गोष्ट नाकारतोय याचं कारण मला अजूनही समजत नाहीये. या लग्नाला आदिल नकार देतोय हे ऐकून मला धक्का बसला आहे. मी त्याला गेल्या सात महिन्यांपासून सांगतेय की, आपण आपल्या लग्नाबद्दल सर्वांना सांगायला हवं. कारण मी एक सेलिब्रिटी आहे. मी माझं जीवन कोणापासून लपून ठेवू शकत नाही. लग्नानंतर प्रेग्नेंसी किंवा काहीही होऊ शकते.”

पुढे राखीला प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आलं असता ती म्हणाली, “सध्या मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी सध्या लग्नाबाबत जो खुलासा केला आहे तोच खूप महत्वाचा आहे. ही गोष्ट जर सर्वांसमोर आली नसती तर खूप त्रास झाला असता. मला खूप भीती वाटतं आहे. माझ्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. मी जर सिंगल मदर झाले तरी मी मरेपर्यंत आदिलवर प्रेम करेन”, असंही राखी म्हणाली.

Sumitra nalawade: