“विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे…”, ‘लायगर’ फ्लॅाप ठरल्यानंतर राम गोपाल वर्मांचं खळबळजनक विधान

मुंबई | Ram Gopal Varma’s Statement In Discussion – अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप ठरला आहे. तसंच बाॅयकाॅट ट्रेंडमुळे देखील हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. याच दरम्यान, चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबाबत आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘लायगर’ चित्रपट सुपरफ्लॉप का ठरला? यामागचं कारण राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. चित्रपटावर याचा नकारात्मक परिणाम झाला. राम चरण, अल्लू अर्जून, ज्युनिअर एनटीआर, प्रभास यांच्या तुलनेमध्ये विजय हिंदी प्रेक्षकांचं मन जिंकू शकला नाही. विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.”

पुढे राम गोपाल वर्मा म्हणाले, “त्याचबरोबरीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरच्या चित्रपटांना सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसंच इतर दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच विजयमध्ये नम्रता नसल्याचं दिसून आलं. म्हणूनच ‘लायगर’ला अपयश सहन करावं लागलं.”

Sumitra nalawade: