मुंबई | Ramdas Athawale – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. आधी सुषमा अंधारे माझ्याही पक्षात होत्या, पण आता शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत (Shivsena) उपनेतेपद दिलं आहे”, असा खोचक टोला रामदास आठवलेंनी सुषमा अंधारेंना लगावलाय. ते शुक्रवारी (9 डिसेंबर) कल्याणमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “सुषमा अंधारेंना शिवसेनेनं टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या, पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे.”
“टीका करण्यात सुषमा अंधारे या ‘एक्सपर्ट’ आहेत. त्यांनी सारखी टीका करू नये. टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये,” असं म्हणत आठवलेंनी अंधारेंना टोला लगावला.