मुंबई | Ramdas Athawale – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात सोमवारी (5 डिसेंबर) एक बैठक पार पडली. या दोघांमध्ये युतीच्या अनुषंगानं पहिली बैठक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यादरम्यान, त्या युतीत भीमशक्ती नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली आहे.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, ‘त्या’ युतीत भीमशक्ती नाही, आंबेडकरांची शक्ती ही ‘वंचित शक्ती’ आहे. एकनाथ शिंदे यांची खरी शिवशक्ती आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर ‘त्या’ शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सगळी शक्ती माझ्याबरोबर असून, ती वंचित शक्ती आहे. परंतु, सध्या मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर असल्यानं शिवशक्ती आणि भीमशक्ती याठिकाणी आहे. दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही, असं रामदास आठवले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली, आणि प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले. तरी आमच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. कारण दलित समाज हा माझ्याबरोबर आहे. मी रिपब्लिकन पक्षाचं नाव टिकवून ठेवलं आहे. राजकारणात एकट्या पक्षानं निवडून येत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.
View Comments (0)