Filmfare Awards 2023 : भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2023) नुकताच पार पडला आहे. अत्यंत दिमाखदार आणि भव्यदिव्य अशा या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) हा पुरस्कार सोहळा होस्ट केला. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ‘फिल्मफेअर 2023’मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने देखील बाजी मारली आहे.
ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटामध्ये फक्त रणबीर कपूर हाच नाही तर आलिया भट्ट ही देखील मुख्य भूमिकेत होती. ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये धमाका करताना रणबीर आणि आलियाचे चित्रपट दिसत आहेत.
9 सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केली. आता ब्रह्मास्त्र चित्रपट फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाजी मारताना दिसतोय. ब्रह्मास्त्र चित्रपटाला थेट वीएफएक्स अवॉर्ड्स देखील मिळाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्स देखील जिंकला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट होता. या चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 410 कोटींचा खर्च आला.