‘रणबीरचं लग्न उद्या नाही…’- रणधीर कपूर यांचा खुलासा

मुंबई : सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. तसंच रणबीर आलियाच्या लग्नाची तयारी जोरात सुरु असताना आता त्याच्या चुलत्यांनी म्हणजेच अभिनेते रणधीर कपूर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी रणबीरचं लग्न उद्या नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

 दरम्यान, 14 एप्रिलला अलिया रणबीरचं लग्न आहे असे सांगण्यात आलं होतं. मात्र आज रणधीर कपूर यांनी रणबीरचं लग्न उद्या नसल्याचं सांगितल्याने चाहत्यांना प्रश्न पडला आहे नक्की लग्नाची तारीख कोणती आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आलिया – रणबीरच्या लग्नावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. तसंच आतापर्यत त्यांच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाल्यानं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Sumitra nalawade: