“राणे, भुजबळांनीही असचं भाषण केलं होतं”; मात्र… राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : सोमवार दि. ४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत भाषण केलं. बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला मीच संभाव्य मुख्यमंत्री होणार असे पक्षाकडून मला सांगण्यात आलं.

पुढे ते म्हणाले, आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही नेमहीच बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक राहू. त्यांनी काही जुन्या गोष्टींकडे लक्ष वेधले, तुम्ही सगळे त्यांच्यासोबत गेले आहात ज्यांनी बाळासाहेबांना ६ वर्षांसाठी मतदान बंदी आणली होती, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता तीव्र होत आहे. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना चौफेर फटकेबाजी करत अनेक खुलासे केले. त्याला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले, याआधी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी देखील अशाच प्रकारे भाषण केलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहा, असं म्हणत राऊत यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं. तुमची ही ती स्थिती होण्यास वेळ लागणार नाही.

Prakash Harale: