कोलंबो : श्रीलंकेतील युनायटेड नॅशनल पार्टीच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने तेथील मीडियाने रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान असतील अशी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते गुरुवारी संध्याकाळच्या वेळेत पदासाठी शपथ घेतील. त्यानंतर कोलंबोतील मंदिराला भेट देऊन पदाचा कार्यभार स्वीकारतील. अशी माहिती आहे.
दरम्यान देशाला संबोधित करताना आपण युवा मंत्रिमंडळ नियुक्त करणार असून त्यात महिंदा राजपक्षे कुटुंबातील एकही सदस्य असणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले असून ते ७३ व्या वर्षी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची शप्पथ घेत आहेत.