‘धर्मवीर’ वरून रंगतोय श्रेयवाद

सिनेमाचे डीओपी केदार गायकवाड यांची पोस्ट चर्चेत

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासुन मराठी चित्रपट सृष्टीत एकापाठोपाठ एक धमाकेदार चित्रपट येत आहेत. त्यामधील २०२२ चा सुपरहिट ठरलेला ‘धर्मवीर,मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट असून याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. शिवसैनिक ‘आनंद दिघे’ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली आहे. नुकताच या चित्रपटाच्या यशाबद्दल ‘बेस्ट फिल्म पुरस्कार’ देण्यात आला. यामधील अनेक कलाकरांना या पुरस्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु धर्मवीर सिनेमाचे छायाचित्रणकार (DOP) केदार गायकवाड यांना निमंत्रित न केल्यामुळे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये केदार गायकवाड म्हणाले की, “धर्मवीर मुक्कम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या टीमचे आणि फक्त मराठी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या आणि अनेक पुरस्कार जिंकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तरी देखील मला निमंत्रित किंवा नामनिर्देशित देखील केलं नाही. तसेच अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांनी मला रात्री फोन करून माझ्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी हा सुंदर संदेश पाठवला. याबाबदल प्रविण जी तुमचे मनापासून खूप खूप आभार!” अशा शब्दात केदार गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, केदार गायकवाड यांनी धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिलेली प्रतिकिया देखील आपल्या पोस्टमधून शेयर केली आहे. धर्मवीर या चित्रपटामध्ये मुख्यभुमिका अभिनेता प्रसाद ओक ने साकारली असून निर्माते मंगेश देसाई हे आहेत. तसेच १३ मे २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये केदार गायकवाड यांनी छायाचित्रणकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने त्यांना या पुरस्कार सोहळ्यात निमंत्रित न केल्यामुळे त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून देखील प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली जात आहे. यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Nilam: