रणवीरने केला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा खुलासा; “म्हणाला…”

मुंबई | ‘काॅफी विथ करण’ हा लोकप्रिय शो आहे. सध्या ‘काॅफी विथ करण 7’ ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये करणचे गेस्ट म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली होती. या चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि त्यातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आणि सेक्स लाइफबद्दल बरेच खुलासे झाले आहेत. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले आहेत.

रणवीरने ‘काॅफी विथ करणमध्ये’ त्याच्या सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे रणवीरने बिंगो गेममध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स केल्याची कबुली दिली आहे. यावेळी त्यानं सांगितलं की, “आम्ही हे आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत.” करण जोहरने रणवीरला, “लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत तू थकला नव्हतास का?” असा प्रश्न विचारल्यावर रणवीरनं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, “नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो.”

या शोमध्ये रणवीर सिंगसोबत आलिया भट्टने देखील आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं आहे. यावेळी आलिया म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो. त्यामुळे ‘सुहागरात’ नावाची कोणतीही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री नसते. लग्नाच्या बाबतीत ही सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे. पण हे सगळं रणवीरला लागू होत नाही. तो नेहमीच उत्साही असतो.”

Sumitra nalawade: