अवघ्या 24 दिवसात ‘महादेवाची शपथ’ मोडणारे; खरचं निष्ठावान असतील?

जळगाव : (Raosaheb Patil Join to Shinde Group) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे खिळखिळ झालेल्या शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मात्र, यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी महादेवाच्या पिंडींवर हात ठेवून आनाभाका घेतलेल्या जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह शंभर समर्थकांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आदित्य यांच्या दौऱ्यापुर्वीच शिवसेनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर आवघ्या काही दिवसांनी पाटील यांनी ठाकरे कुटुंबाप्रती आपली असलेली निष्ठा दाखवण्यासाठी ही शपथ घेतली होती.

यावेळी त्यांनी आपण उध्दव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, या निष्ठेच्या शपथ घेण्याला 24 दिवस उलटत नाही तोच, रावसाहेब पाटील हे आज शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यातून एक लक्षात येते महादेवाची शपथ मोडणारे पक्षासोबत काय एकनिष्ठ राहणार आहेत. फक्त बोलाचीच कडी अन् बोलाचाच भात हे मात्र नक्की.

Prakash Harale: