पुण्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, PSI वर गुन्हा दाखल

Blue Guest Featured Live Event Twitter Post 72Blue Guest Featured Live Event Twitter Post 72

पुणे | पुणे शहर विद्येचे माहेर घर असं म्हटलं जात आहे. परंतु वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून पुणे शहर हे आरोपींचे घर असं म्हटलं जात आहे. दरम्यान रक्षकचं भक्षक झाल्याचे चित्र पुण्यातून दिसून आलं आहे. पुण्यात पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार एका पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केला आहे.

तरुणीला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षकाने तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८) असे गुन्हा दाखल केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे.

महामुनीने तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेले. तेथे तिला धमकावून गर्भपात केला, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीने नुकतीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line