रश्मी शुक्ला मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी? पालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून चाल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रश्मी शुक्ला यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्याचा घाट भारतीय जनता पक्षाकडून घातला जात असल्याची चर्चा राजकीय आणि पोलीस वर्तुळात होत आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते.

गंडांतर दूर :
फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंगचे गंडांतर दूर झाले आहे.

पुणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आश्चर्यकारक यश मिळवले होते. त्या वेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. त्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात पोलिसांचा हातभार मोठा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने तो स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे शुक्ला यांच्यावरील सर्व अाक्षेप दूर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी मोहित कंबोज यांच्यासोबत सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच शुक्ला मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता.

गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत
आल्या होत्या.


Dnyaneshwar: