Rashmika Mandana tollywood actress : सुपरहिट ‘पुष्पा’ सिनेमात मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य करणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. रश्मिका आता फक्त साउथ सिनेविश्वासाठी मार्यादित राहिली नसून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. रश्मिका तिचे सिनेमे आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. त्यामुळे अभिनेत्रीबद्दल कोणतीही छोटी गोष्ट देखील चाहत्यांपर्यंत लगेच पेहोचते. सध्या रश्मिका तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे.
अवघ्या पाच वर्षांच्या करिअरमध्ये श्रीवल्लीनं मोठी संपत्ती कमावल्याची चर्चा आहे. तिच्या फ्लॅटविषयी नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. रश्मिकानेच तिच्या ट्विटर अकाउंटवरुन चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, तुम्हाला माहिती आहे का, मी पाच वर्षांपूर्वी माझ्या करिअरला सुरुवात केली होती. आणि आता पाच वेगवेगळ्या गोवा, हैद्राबाद, कूर्ग, मुंबई आणि बंगळुरु ठिकाणी पाच फ्लॅट्स आहेत.
पुष्पापासून फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झालेल्या रश्मिकानं आपल्या प्रभावी कामगिरीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एखाद्या सेलिब्रेटीला लोकप्रियता मिळाली की, त्या व्यक्तीवर मीडियाचे लक्ष जाते. रश्मिकाच्याबाबत देखील हेच झाले. मीडियानं तिच्याविषयी बोलल्यानंतर अनेकांना रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटले. आता तर असे म्हटले जात आहे की, रश्मिकानं वेगवेगळ्या पाच ठिकाणी पाच फ्लॅट्सची खरेदी केली आहे.
आपल्या घराविषयी फार चर्चा होऊ लागली असे जेव्हा रश्मिकाला कळले तेव्हा मात्र तिनं त्यावर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आपली पूर्वीचीच एक पोस्ट शेयर करुन त्यावर फक्त असं जर झालं असतं तर….असे म्हटले आहे. यानंतर मात्र तिच्या चाहत्यांना खरं काय आहे ते कळून चुकले आहे. इंस्टावर देखील एक फोटो पोस्ट करुन लिहिलं आहे की, मित्रांनो नेहमी आनंदी राहा. आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद हे सगळ्यांच्या अगोदर येतात. हे लक्षात ठेवा.
सध्या रश्मिका ही आपल्या आई वडिलांसोबत कर्नाटकातील विराजपेटमध्ये राहते. २०२१ मध्ये रश्मिकानं एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिनं सांगितलं होतं की, गोव्यामध्ये एक नवं घर घेतलं आहे. रश्मिका ही नेहमीच हैद्राबाद, मुंबई याठिकाणी शुटिंग करते. त्यामुळे तिनं घर घेतल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.