अनेकवेळा व्यक्तीच्या डोक्यात चांगल्या आयडिया येतात. मात्र ती खरंच ग्रेट आयडिया आहे की फेल हे तिला अस्तित्वात आणल्याशिवाय समजत नाही. व्यवसायासंदर्भात तर कधीच नाही.
प्रत्येक व्यक्तीकडे कितीही भन्नाट आयडिया असली तरीही तिला अस्तित्वात आणल्याशिवाय हे नक्कीच भन्नाट आहे की नाही हे समजत नाही. व्यवसायातही अगदी तीच गत असते. आपल्याकडे चांगल्या-चांगल्या आयडिया येत असतात, मात्र त्या यशस्वी होतील की नाही याची भीती असते. त्यामुळे अनेकवेळा एखाद्या चांगल्या व्यवसायाची आयडिया व्यक्ती अस्तित्वात आणायला टाळते आणि तिथेच तो मोठी चूक करून बसलेलो असतो. असाच प्रसंग पुण्यातील तुषार खोपडे यांच्यासमोर देखील आला होता.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यात व्यवसायाची चांगली आयडिया आली, मात्र व्यवसाय यशस्वी होईल का? हा खूप मोठा प्रश्न होता. प्रश्न मोठा आहे म्हणून त्यांनी आपली आयडिया अस्तित्वात आणायचं सोडलं नाही. त्यांच्या मनात दोनचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या बॅटरींचा दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करण्याची आयडिया होती. यशस्वी होईल किंवा नाही याचा त्यांनी विचार न करता, व्यवसाय करायचाच हे मनात पक्कं केलं.
व्यवसाय अयशस्वी झाला तर खूप मोठं नुकसान होणार हे त्यांना माहिती होतं. त्यासाठी त्यांनी अगोदर बॅटरीच्या दुकानात माहिती करून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी काम सुरू केलं. काही दिवस अनुभव घेतला. संपूर्ण माहिती मिळवली. बॅटरी दुरुस्तीचं काम शिकलं आणि व्यवसायात पाऊल टाकलं.
एक्साईट कंपनीच्या दोनचाकी, चारचाकी, सर्व प्रकारच्या वाहनांच्या आणि इन्व्हर्टरच्या बॅटरी दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप त्यांनी सुरू केलं. पुण्यातील वारजे माळवाडीतील भाजीमंडई परिसरात ‘कुंजल बॅटरी सर्व्हिसेस’ नावाने सुरू केलेलं शॉप आता चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. बॅटरींचा दर्जा आणि उत्तम सेवा यासाठी कुंजल बॅटरी सर्व्हिसेस लोकप्रिय आहे.