अनिल देशमुख आणि नवाब मालिक मतदान करणार ? अजित पवार म्हणाले…

मुंबई – Ajit Pawar On Anil Deshmukh And Nawab Malik | राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत याच पाश्वभूमीवर (Rajyasabha Elections) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याबाबत काही सूचक वक्तव्य केली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते गुरुवारी जनता दरबार (Janata Darabar) उपक्रमादरम्यान माध्यमांशी बोलत होते.

देशमुख आणि मलिक यांना मतदानासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीकडून वकिलाची नेमणूक करण्यात आली आहे. आणि त्यांना नक्कीच मतदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं अजित पवार यांनी सांगितल आहे. यापूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) आणि रमेश कदम (Ramesh Kadam) यांनाही अशाप्रकारे मतदानासाठी परवानगी मिळाली होती. त्याचप्रमाणे देशमुख आणी मलीकांनाही मिळेल असंही ते म्हणाले.

दरम्यान यावेळी ओबीसी आणि महिला आरक्षणावरही ते बोलले, जर मध्य प्रदेश सरकारसारखं आपलं ओबीसी आरक्षण यशस्वी झालं तर ज्या त्या प्रभागाप्रमाणे ते उमेदवारांना मिळेल असंही ते म्हणाले. (OBC Reservation)

Dnyaneshwar: