राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी ‘यांची’ नियुक्ती

इंदापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संग्रामसिंह प्रशांतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रशांतराव पाटील यांच्या उपस्थितीत संग्रामसिंह प्रशांतराव पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार पाटील यांची राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे महबूब शेख यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

यावेळी बोलताना संग्रामसिंह पाटील म्हणाले की, भारत देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्व युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे.

यापूर्वी संग्रामसिंह पाटील यांनी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पडली असून त्यांनी बावडा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या निवडीनंतर परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, अतुल झगडे, शुभम निंबाळकर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Sumitra nalawade: