‘मेघमल्हार’मध्ये रसिक चिंब

पुणे : आषाढातील पहिला दिवस… वेळ सायंकाळची… दाटलेले नभ… त्याचवेळी किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित परितोष पोहनकर यांनी आळवलेल्या मेघमल्हारच्या सुरावटीत रसिकांना चिंब होण्याची अनुभूती तर आलीच आणि निसर्गानेही पंडित पोहनकर यांच्या गायनाला दाद देत मेघांची बरसात केली. निमित्त होते ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफलीचे!

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि गांधर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित परितोष पोहनकर यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची मैफल गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आली होती. ललित कला केंद्राच्या माजी विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास, विभागीय कार्यालयाच्या संचालिका निशी बाला, संजीवनी स्वामी उपस्थित होते.

Sumitra nalawade: