मुंबई | एकेकाळी बॉलिवूड राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon). चित्रपटांमधील पारंपरिक भूमिका आणि तिच्या अभिनयाने रविनाने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. टीप टीप बसरला या गाण्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आजही रवीनाची लोकप्रियता कायम आहे. तुम्हाला माहिती आहे का रवीना अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) डेट करत होती. त्यांचा साखरपुडा होणार होता. मात्र काही कारणास्तव त्यांचा साखरपुडा मोडला होता. आता जवळपास दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर रवीनाने यावर मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना रवीना म्हणाली, “इतकी वर्षे उलटली आहे, पण जेव्हा माझं नाव गुगल केलं जातं, तेव्हा माझ्या नावासोबत त्याचं नावही येतं आणि त्या चॅप्टरचा उल्लेख तिथे होतोच.”
पुढे ती म्हणते, “पण, जर मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले होते, तर या सर्व गोष्टींना अर्थ उरत नाही. कारण मी आधीच दुसर्याला डेट करत होते आणि तोही दुसर्या कुणाला तरी डेट करत होता, मग मला वाईट का वाटेल?”
आपण अक्षयबरोबर साखरपुडा केव्हा केला होता, हे आता मी विसरली आहे. असही रविना म्हणाली.
रविना म्हणते, “मोहराच्या काळात आम्ही एक हिट जोडी होतो आणि आताही आहोत, जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना कुठेतरी भेटतो, आम्ही सर्व गप्पा मारतो आणि पुढे जातो”, असं तिने सांगितलं.
रवीनाशी ब्रेकअप झाल्यामुळे अक्षयने तिच्यासारख्या दिसणाऱ्या ट्विंकल खन्नाला डेट केलं होती, अशाही चर्चा खूप रंगल्या होत्या. याबाबत विचारलं असता “मी त्याबद्दल लिहिलेले काहीही वाचणार नाही, कारण गरज नसताना मी माझा BP का वाढवू?” अशी प्रतिक्रिया रवीनाने दिली.