रवी राणा-बच्चू कडू वाद टोकाला, शिंदे-फडणवीसांनी केला मध्यस्थीचा प्रयत्न

अमरावती : (Ravi Rana On Bachhu kadu) बडनेराचे मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार कच्चू कडू यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा वाद टोकाला पोहोचला आहे. त्यांच्या वादाची राज्याभर चर्चा होत असल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मध्यस्थी करावी लागल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, एक कार्यक्रमात आ. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केला होता. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. याला बच्चू कडू यांनी काल सणसणीत उत्तर दिलं. आ. रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासेन, असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट हल्लाबोला केल्याने राणा-कडू असा वाद यामुळे टोकाला पोहोचला आहे.

त्यांच्या या वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोघांबरोबर फोनवर संवाद केल्याची माहिती आहे. त्यामुळे ते जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करु, असं कडू-राणा म्हणाले आहेत.

Prakash Harale: